Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : नितिश कुमार यांना मोदी सरकारचा मोठा झटका

मोठी बातमी : नितिश कुमार यांना मोदी सरकारचा मोठा झटका

Rejection special state status Bihar : बिहार सरकारने गेल्या अनेक दिवसांपासून राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. मात्र, एनडीए सरकारने या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सातत्याने केली होती, परंतु एनडीए सरकारच्या या निर्णयाने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

बिहारमधील जेडीयू खासदार रामप्रित मंडल यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना, अर्थ खात्याचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट केले. एनडीए सरकारच्या या भूमिकेवर आता जेडीयू पक्षाचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) काय निर्णय घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

बिहारला विशेष राज्याचा दर्जा का महत्त्वाचा?

बिहार हे आर्थिक मागासलेले राज्य आहे, आणि विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यास राज्याला विविध आर्थिक सवलती आणि केंद्रीय मदतीचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील विकास प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल, असे नितीशकुमार यांचे म्हणणे आहे.

राजकीय समीकरणे आणि पुढील वाटचाल (Nitish Kumar)

सध्या एनडीए सरकारला पूर्ण बहुमत नाही आणि त्यांना जेडीयूच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नितीशकुमार यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु एनडीए सरकारने त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे जेडीयू पक्षाचे भविष्यातील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एनडीए सरकारच्या या निर्णयामुळे बिहारला अपेक्षित असलेली आर्थिक मदत आणि सवलती मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. राज्यातील नागरिक आणि नेत्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे. नितीशकुमार आणि जेडीयू पक्षाची पुढील रणनीती काय असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केली, राहत्या घराची स्वच्छता

संबंधित लेख

लोकप्रिय