मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुरवली असताना झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वांद्रे पूर्वेतील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन ते चार जणांनी हल्ला केला. सिद्दीकी यांना दोन ते तीन गोळ्या लागल्यानंतर, त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्राथमिक तपासात हा हल्ला SRA प्रकल्पाच्या वादाशी संबंधित असल्याचा अंदाज आहे.
बाबा सिद्दीकी यांनी 15 दिवसांपूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती, त्यानंतर त्यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली होती. वाय श्रेणी सुरक्षा असतानाही हल्ला कसा झाला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी सुरक्षेतील त्रुटीबद्दलही विचारणा केली जात आहे. गोळीबाराच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल नेमका कुठे होता, याचा शोध घेतला जात आहे. (Baba Siddique)
Baba Siddique यांची राजकीय कारकीर्द
66 वर्षीय बाबा सिद्दीकी हे तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत आणि एकदा मंत्रीपद भूषवले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता.
बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूडमधील संबंध
बाबा सिद्दीकी हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद मिटवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा :
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती