Sunday, May 19, 2024
Homeराज्यनाझरा : कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

नाझरा : कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

सांगोला (सोलापूर) : कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीत नाझरा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्स्फूर्तपणे संपन्न झाले. रेवनील ब्लड बँक, सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

नाझरा येथील पुरोगामी युवक संघटना तसेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्याला रक्ताची गरज भासत आहे. त्यासाठी सरकारकडून वेळोवेळी आवहान देखील केले जात आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत एक सामाजिक जाणीव लक्षात ठेवून नाझरा येथील पुरोगामी युवक संघटना आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान शिबीरास सरपंच विजयकुमार देशमुख, उपसरपंच प्रणाम चौगुले, अशोक पाटील, सूर्यकांत आदाटे, पुरोगामी युवक संघटनेचे सचिव शिवाजी सरगर, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कॉम्रेड  अतुल फसाले व इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिरास रेवनील ब्लड बँकेचे पूजा काटे, स्नेहल काटे, शिवतेज तेली, सौरभ केदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सध्याची कोलमडलेली आरोग्य व्यवस्था लक्षात घेऊन रक्तदान शिबीर कोविड नियमांचे पालन करून योग्य पद्धतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबिरास तरुणांनी व प्रौढांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय