Friday, November 22, 2024
HomeNewsजिल्हा न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : जिल्हा न्यायालय येथे गुरुवारी (दि. 9) राष्ट्रीय (Pune)विधी सेवा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या विविध सेवा आणि इतर माहितीचे पत्रक यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. हे पत्रक शहरातील 100 रिक्षांवर लावण्यात येणार आहे.

प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या हस्ते माहिती (Pune)पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. रिक्षावर माहितीपत्रक लाऊन त्या माहितीचा शहरात प्रसार केला जाणार आहे. या मोहिमेचा आरंभ गुरुवारी जिल्हा न्यायालय येथे झाला. जिल्हा न्यायालयातून रिक्षांना हिरवा झेंडा दाखवून रिक्षा मार्गस्थ करण्यात आल्या.

जिल्हा न्यायाधीश नांदेडकर, जिल्हा न्यायाधीश एस. जी. वेदपाठक, न्यायाधीश ए. एस. वाघमारे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी रिक्षांना हिरवा झेंडा दाखवला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने रिक्षा चालकांनी कार्यक्रमास सहभाग घेतला होता, यावेळी ॲड.अतिश लांडगे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय