Sunday, May 19, 2024
HomeNewsनाशिक : ९ ऑगस्ट क्रांती दिनी कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने...

नाशिक : ९ ऑगस्ट क्रांती दिनी कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने तीव्र निदर्शने.

नाशिक : कामगार- शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकारने मागे घ्यावे, कोरोना काळात आयकर उत्पन्न पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दरमहा ७५०० रुपये थेट मदत करण्यात यावी, यासाठी आज नाशिक येथे हुतात्मा स्मारक नाशिक व शाहिद स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. व बाहेर गेट वरती तीव्र निदर्शने करण्यात आले. 

९ आगस्ट क्रांती दिनी देशव्यापी केंद्रीय कामगार संघटना व विविध फेडरेशन वतीने आंदोलन कामगार शेतकरी विरोधी धोरण राबविणारे केंद्र सरकारने भारत छोडो आंदोलन पुकारले होते.

या प्रसंगी असंघटित कामगार, आयकर पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांना दरमहा ७५०० रुपये आर्थिक मदत केंद्र सरकारने द्यावी. कोरोना मुळे लाखो कामगार बेरोजगार झालें आहेत . प्रत्येकला १० किलो धान्य, डाळ, जीवनावश्यक वस्तू  पुरोवटा मोफत दरमहा मानसी करा, रेल्वे खाजगीकरणचा निषेध करण्यात आला, मनरेगा मजुर ला ५०० रुपये किमान वेतन व प्रत्येकी २०० दिवस काम द्यावे, आशा, गट प्रवर्तक, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक ना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावे, राज्य सरकारी, जीप कर्मचारी ना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावेत, लॉकडाऊन काळातील कामगार ना संपुर्ण वेतन देण्यात यावे, एल.आय.सी. चे खाजगीकरण रद्द करावे, 

कोरोना रुग्ण वरती मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावे, आरोग्य वरचा खर्च वाढविण्यात यावा, वीज बिल कोरोना काळातील माफ करण्यात यावे, मोलकरीण, यत्रमाग कामगार, रिक्षा चालक, सलून व्यावसायिक, शेतमजूर साठी सामाजिक सुरक्षा देणारे मंडळ स्थापन करावे, ईपीएस ९५ पेन्शनर्स ला किमान ९ हजार रुपये पेंशन महागाई भत्ता सह लागू करावा, कंत्राटी पद्धत रद्द करा, कंत्राटी कामगार, कर्मचारीना त्वरित कायम करावे, किमान वेतन 21 हजार रुपये देण्यात यावे, आदिवासी कसत असलेल्या वन जमिनी नावावर करण्यात यावेत, कामगार कायदा ची अंमलबजावणी करावी, कोरोना काळात रोजगार गेलेले पत्रकार, माध्यम कर्मी, कामगार, कर्मचारी ना स्वतंत्र मदतीचे पँकेज जाहीर करण्यात यावे, बांधकाम कामगार ना मंडळ कडून त्वरित १० हजार रुपये द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. 

या आंदोलनात जेष्ठ कामगार नेते सिटू चे डॉ. डी. एल. कराड, आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले,  व्ही. डी. धनवटे, राज्य सरकारी कर्मचारी नेत्या सुनंदा जरांडे, श्याम सुंदर जोशी,  जिल्हा परिषद कर्मचारी  महासंघ नेते अरुण आहेर, मंगल भवर, विजय महाले, सफाई कामगार नेते महादेव खुडे, एल. आय. सी. नेते मोहन देशपांडे, अरुण म्हस्के, सीताराम ठोंबरे, दत्तू तुपे, सचिन मालेगवकर, मुकुंद रानडे,  दिलीप थेटे, तुकाराम सोनजे आदी उपस्थित होते

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय