Narendra Modi : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यात महायुतीच्या सभेत गरिबांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना पक्के घर देण्याचं आश्वासन देत त्यांनी सांगितलं की, तीन कोटी नवीन घरांच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक गरिबांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही घराघरात जाल, लोकांना भेटालं “जर तुम्हाला एखादं कुटुंब झोपडीत राहताना दिसलं, तर त्यांच्या नाव, पत्त्यासह माहिती माझ्याकडे पाठवा. त्यांना सांगा, ‘मोदींनी मला पाठवलंय; तुला पक्कं घर मिळेल.असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यात झालेल्या सभेत दिलं आहे.“
पंतप्रधान मोदींनी 70 वर्षांवरील वृद्धांना मोफत उपचारांसाठी आयुष्मान कार्ड मिळू लागल्याचंही सांगितलं. “तुमच्या कुटुंबात कोणी 70 वर्षावरील वृद्ध असेल तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी माझ्यावर सोडा,” असं मोदींनी भावनिक आश्वासन दिलं.
कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधत हल्लाबोल केला. काँग्रेस आणि या आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राची अनेक दशकापासूनची मागणी पूर्ण केली नाही, ती मागणी आम्ही पूर्ण केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. केंद्रात एनडीए सरकार तेजीत आहे. त्याच तेज गतीने महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात पाहिजे, यासाठी तुमचा आशीर्वाद मागायला आलोय, असं नरेंद्र मोदी सभेत म्हणाले.
राम मंदिराच्या ऐतिहासिक निर्णयाचाही उल्लेख करत मोदी म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे; 9 नोव्हेंबर 2019 रोजीच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला होता. या ऐतिहासिक दिवसाला महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळालेल्या आशीर्वादाचे महत्व अनमोल आहे.
“तसेच महाराष्ट्रातील वाढवण बंदरासाठी 80 हजार कोटींचा निधी मंजूर केल्याचं सांगत हे बंदर भारतातील सर्वात मोठं बंदर होईल, असा दावा केला.
Narendra Modi
हेही वाचा :
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
राज्यात थंडीचा जोर वाढणार ; हवामान विभागाने दिला इशारा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर
चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा
शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार