Home राज्य Nagpur : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या घटक दलाची बैठक संपन्न

Nagpur : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या घटक दलाची बैठक संपन्न

Nagpur: India Aghadi Constituent Party meeting for Lok Sabha election campaign concluded

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी सेक्युलर या पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक आज कॉम्रेड मनोहर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाली. बैठकीत नागपूर (Nagpur) लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा तन-मन-धनाने प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्रातील मोदी सरकारने संविधान बदलण्याचा संपूर्ण संकल्प केला असून अबकी बार 400 पारच्या घोषणेतून ही बाब सिद्ध होते. हिंदुत्वाच्या नाऱ्याच्या आड कार्पोरेटचा फायदा करण्याचे धोरण सातत्याने मोदी सरकारने चालवले असून संविधानाने भारतीय जनतेला नागरिक बनवण्याचा जो अधिकार दिला आहे, त्या ऐवजी आश्रितांची फौज निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. त्यामुळे भारतीय संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. Nagpur News

रस्ते, उड्डाणपूल यासारख्या कामातून भारताचा विकास होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी भारतावर कर्जाच्या प्रचंड बोजा मोदी सरकारने निर्माण करून ठेवला आहे. तसेच केंद्रात रस्ते बांधणी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नितीन गडकरी यांच्या खात्यातही तीन लाख वीस हजार कोटीचे कर्ज करून ठेवलेले आहे ही बाब मतदारांनी नजरेआड करू नये असे आवाहन मतदारांना करण्यात आले.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

Exit mobile version