MVA Protest : बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज राज्यभर निषेध आंदोलन आयोजित केले आहे. या आधी, महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारल्यानंतर आता आघाडीने शांततेत निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
MVA Protest
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे स्टेशन परिसरात निषेध आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी १० ते ११ या वेळेत चाललेल्या या आंदोलनात शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी हाताला काळी फीत आणि तोंडाला काळा मास्क लावला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन शांततेत पार पडले.
शरद पवार यांच्याशिवाय शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. उद्धव ठाकरे हे दादर येथील शिवसेना भवनासमोर ११ वाजता आंदोलन केले, तर नाना पटोले यांनी ठाण्यात निषेध आंदोलन केले.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन