Sunday, May 19, 2024
Homeराज्यमुंबई : आशा व गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर जोरदार आंदोलन, 'या' आहेत मागण्या 

मुंबई : आशा व गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर जोरदार आंदोलन, ‘या’ आहेत मागण्या 

मुंबई : आशा व गटप्रवर्तकांनी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे जोरदार आंदोलन सुरू केले आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हे लक्षवेधी आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागांत राष्ट्रीय आरोग्य अभियानांत ७० हजार स्वयंसेविका व ४००० गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. तो सुध्दा अत्यंत कमी मिळतो. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्वाचे काम करीत असुन त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाने आयोजिलेल्या आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीतसुदधा आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक नेटाने सक्षमपणे कामे करतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांची नेमणुक भारतीय संविधानाच्या ४७ कलमातील पुर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरुपी आहे. म्हणुन त्यांना मानसेवी मानधनी स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे, असेही कृती समितीने म्हटले आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची पदे कायद्यानुसार निर्माण केलेली (Statutory post) पदे आहेत. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासनाचे कर्मचारी असुन केंद्र / राज्य सरकार त्यांचे मालक आहे व राष्ट्रीय आरोग्य अभियान ही आस्थापना आहे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाला मोबदला म्हणुन संबोधणे योग्य नाही, ते वेतन आहे. म्हणुन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देवुन त्यांना अनुषंनिक सर्व फायदे देण्यात यावे. नुकताच केंद्र शासनाचा अर्थ संकल्प सादर झाला , त्यात आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना काहीही दिले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात केंद्र शासना प्रति नाराजी निर्माण झालेली आहे. आता राज्याचा अर्थ सर्कल्प सादर होणार आहे. राज्य शासनाकडुन आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना खुप अपेक्षा आहेत, असेही कृती समितीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Mumbai : Strong protest of Asha and group promoters at Azad Maidan

गटप्रवर्तकांच्या मागण्या : 

1. राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे काम एकसमान आहे. गटप्रवर्तकांचा समावेश कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये करण्यात आला नाही. त्यांना दोन्यावर आधारीत मोबदला मिळतो. तोही अत्यल्प, त्यांना मिळणारा मोबदला बहुतांश प्रवासावर खर्च होतो. त्यांच्या प्रपंचासाठी हातात रक्कम शिल्लक राहात नाही. या बाबीचा विचार करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांचा कंत्राटी कर्मचान्यामध्ये समावेश करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दि . ०५/१०/२०२० पासून लागू करण्यात आलेली नविन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांना सुद्धा लागु करुन मागील फरकासहीत गटप्रवर्तकांना थकबाकी देण्यात यावी.

2. गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धिनीमध्ये समावेश केलेला नाही. परंतु आरोग्य वर्धिनी अंतर्गत आशांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तकांना करायला सांगतात. त्यामुळे गटप्रवर्तकांचा आरोग्य वर्धीनी कार्यक्रमात समावेश करुन दरमहा १५०० /- रु. मोबदला गटप्रवर्तकांना देण्यात यावा.

3. गट प्रवर्तकांना डेटा एंन्ट्रीकरीता प्रतिदिन रु. ५० याप्रमाणे एकुण ५ दिवसांकरीता प्रति महा रु. २५० सन २०२०-२१ च्या पीआयपीमध्ये मंजुर केल्याचे दि. २१ नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकादवारे आदेशीत केले आहे. परंतु सदर मोबदला गट प्रवर्तकांना दिला जात नाही. आशा सॉफटवेअर जरी सध्या बंद असले तरी रिपोर्टिंग करण्याचे काम गटप्रवर्तक करतात. तेव्हा एप्रील २०२० पासुन प्रति महा रु. २५० /- गट प्रवर्तकांना त्वरीत अदा करण्यात यावेत.

4. गटप्रवर्तकांना वीस दिवस दौरे करून पाच दिवस पी.एच.सी.त अहवाल तयार करावा लागतो. दुर्गम अतिदुर्गम भागात वाहनांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांना दौरे करण्यासाठी स्कुटर देण्यात यावी.

5. गटप्रवर्तकांना दर आकरा महिन्यांनी नेमनुकीचे आदेश दिले जातात. तसे न करता गटप्रवर्तकांना कायम नेमनुकीचे लेखी आदेश देण्यात यावेत.

आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या :

1. आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत आशा स्वयसेविकांना दरमहा १८००० रु. व गटप्रवर्तकांना २५००० रु. मानधन देण्यात यावे.

2. आशा स्वयंसेविकांचे व गटप्रवर्तकाचे कामावर आधारीत मोबदल्याचे दर ५-६ वर्षापुर्वी ठरवलेले आहेत. त्यानंतर महागाई दुपटी – तिपटीने वाढली. परंतु त्या दरामध्ये बदल केलेला नाही. वाढलेल्या महागाईच्या प्रमाणांत कामावर आधारीत मोबदल्याचे दर वाढवुन देण्यात यावे. 

3. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दर वर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्याएवढा बोनस देण्यात यावा. 

4. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी. 

5. ९ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार जुलै २०२२ पासुन आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात पाचशे रुपयांची वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.

6. दि. २३ जुन २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी कृति समितीची बैठक झाली. सदर बैठकीत आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्याबाबत त्यांच्या सेवाशर्ती ठरवण्यासाठी आरोग्य विभाग, यशदा व कृति समिती पदाधिकारी यांची समिती गठीत करायचे ठरले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. 

7. केंद्र निधी (पीआयपी) आणि राज्य निधी मधुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचा मोबदला दिला जातो. तो एकत्रित व दरमहा नियमित पाच तारखेच्या आत देण्यात यावा.

8. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना उत्कृष्ट अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन देण्याचे तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याची त्वरीत अंमलबजावणी व्हावी.

9. नागरी भागातील आशांचे महिला आरोग्य समिती ( MAS ) स्थापन नसल्यामुळे त्यांच्या मोबदल्यात केली जाते.सदर समिती स्थापन करण्याची जबाबदारी ही अधिकारी वर्गाची असुन त्यांच्या हयगईमुळे आशांचे नुकसान होत आहे. तेव्हा आशांच्या मोबदल्या काटछाट करु नये. 

या आंदोलनात एम.ए.पाटील, आनंदी अवघडे, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, राजु देसले, स्वाती धायगुडे, रंजना गारोळे आदींसह आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय