मुंबई : ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्या वतीने अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी 2 जुलै 2022 रोजी 90 फूट रोड, धारावी, मुंबई येथे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात नसिरुल हक, प्रसाद घागरे, शंकर कुंचीकोर्वे आदीसह सहभागी झाले होते.
या आंदोलना संबोधित करताना नसिरुल हक म्हणाले की, ही योजना राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याशिवाय काही नाही. सरकारने ही योजना संसदेत चर्चेसाठीही मांडली नाही आणि संसदेत चर्चा न करताच ही योजना सुरू केली.
अग्निवीरला नियमित संरक्षण कर्मचार्यांच्या बरोबरीचे फायदे मिळणार नाहीत. हे संरक्षण क्षेत्राचे खाजगीकरण आहे आणि यामुळे शक्तीची ताकद कमकुवत होईल, असेही नसिरुल हक म्हणाले.