Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सोशल मीडिया वरील प्रसिद्ध सिंगर कै.बालम यांच्या कुटुंबीयांची घेतली श्री प्रदीप वाघ यांनी सांत्वन पर भेट.

पालघर : नुकतीच झालेल्या दुर्दैवी घटनेत शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचा प्रसिद्ध गायक कै.बालम रतन दिवे यांनी मासेमारी करताना जीव गमावला होता.सोशल मीडिया वरील त्यांची गाणी खूप होती, त्यांचे पोरी तु सपनात हे गाणे तुफान गाजले होते.

अशा या गायक, कवी च्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे,हि बातमी समजताच आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाला आर्थिक व किराणा सामान देऊन मदत केली व सांत्वन केले.

यावेळी श्री मंगेश दाते कार्याध्यक्ष,श्री गणेश वाघ पत्रकार, श्री विठ्ठल गोडे पोलिस पाटील, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच ,अंनता वारे ग्रामपंचायत सदस्य, श्री चुनीलाल पवार सर, श्री राम फसाळे,सागर वराटे, अशोक वाघ, संजय वाघ, रमेश बोटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles