Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याखासदार उदयनराजे भोसले यांची पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार ?, केले "हे" सुचक...

खासदार उदयनराजे भोसले यांची पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार ?, केले “हे” सुचक विधान !

Photo : @Chh_Udayanraje / Twitter

पुणे : २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले यांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात उदयनराजे यांनी देखील एक सुचक विधान केले आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या उदयनराजे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटींमुळे उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीच्या चर्चेला उधान सुटले आहे. 

धक्कादायक : दलित तरुणांने मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याने दलित समाजावर टाकला बहिष्कार

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्याच्या विकास कामांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

पत्रकारांनी उदयनराजे यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं कि, “शिवाजी महाराजांचं जसं सर्वधर्म समभाव हे धोरण होतं, तसंच माझंही धोरण सर्व पक्षीय समभाव असं आहे”. उदयनराजे यांच्या या सुचक विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

सैराट’ फेम आर्चीला रिअल ‘परशा’ मिळाला ? डिनर डेटने रंगली चांगलीच चर्चा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय