Sangli, दि. १९ : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होत असून जिल्ह्यात लोकसभेसाठी 24 लाख 36 हजार 820 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 43 हजार 397 इतके पुरुष मतदार, 11 लाख 93 हजार 291 स्त्री मतदार आणि 132 इतक्या तृतीपंथी मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. Sangli
मिरज विधानसभा मतदारसंघात 1 लाख 65 हजार 208 पुरूष व 1 लाख 61 हजार 83 स्त्री आणि 25 तृतीयपंथी मतदार, सांगली विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 542 पुरूष व 1 लाख 67 हजार 889 स्त्री आणि 66 तृतीयपंथी मतदार, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 43 हजार 49 पुरूष व 1 लाख 41 हजार 518 स्त्री आणि 8 तृतीयपंथी मतदार, खानापूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 71 हजार 333 पुरूष व 1 लाख 64 हजार 156 स्त्री आणि 18 तृतीयपंथी मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 54 हजार 107 पुरूष व 1 लाख 46 हजार 869 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार, जत विधानसभा मतदारसंघात 1 लाख 48 हजार 785 पुरूष व 1 लाख 33 हजार 511 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 37 हजार 945 पुरूष व 1 लाख 33 हजार 475 स्त्री आणि 5 तृतीयपंथी मतदार, शिराळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 52 हजार 428 पुरूष व 1 लाख 44 हजार 790 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार आहेत.
44- सांगली लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील मिरज, सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 9 लाख 53 हजार 24 पुरुष मतदार, 9 लाख 15 हजार 26 स्त्री मतदार आणि 124 तृतीपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 48-हातकणंगले या लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 2 लाख 90 हजार 373 पुरुष मतदार, 2 लाख 78 हजार 265 स्त्री मतदार आणि 8 तृतीपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Sangli
18-19 वयोगटातील 40 हजारावर मतदार
जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 40 हजार 811 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामधे 44- सांगली लोकसभा मतदार संघातील मिरज विधानसभा मतदार संघात 2 हजार 740 पुरुष, 2 हजार 404 स्त्री आणि एक तृतीयपंथी मतदार, सांगली विधानसभा मतदार संघात 2 हजार 758 पुरुष, 2 हजार 29 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार, पलूस-कडेगांव विधानसभा मतदार संघात 3 हजार 181 पुरुष, 2 हजार 306 स्त्री मतदार, खानापूर विधानसभा मतदार संघात 3 हजार 130 पुरुष, 2 हजार 237 स्त्री आणि 2 तृतीयपंथी मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात 2 हजार 755 पुरुष, 1 हजार 974 स्त्री मतदार, जत विधानसभा मतदार संघात 3 हजार 533 पुरुष, 2 हजार 458 स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदार संघात 2 हजार 556 पुरुष, 1 हजार 772 स्त्री मतदार आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 950 पुरुष, 2 हजार 21 स्त्री आणि एक तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Sangli
जिल्ह्यात 20 हजारावर दिव्यांग मतदार
जिल्ह्यात 20 हजार 685 दिव्यांग (Person with Disability) मतदार असून यामध्ये 13 हजार 458 पुरुष तर 7 हजार 227 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मिरज विधानसभा मतदार संघात 1 हजार 31 पुरुष व 644 स्त्री मतदार, सांगली विधानसभा मतदार संघात 918 पुरुष व 649 स्त्री मतदार, पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात, 1 हजार 401 पुरुष व 699 स्त्री मतदार, खानापूर विधानसभा मतदार संघात 1 हजार 943 पुरुष व 959 स्त्री मतदार, तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघात 2 हजार 633 पुरुष व 1 हजार 326 स्त्री, जत विधानसभा मतदार संघात 2 हजार 120 पुरुष व 1 हजार 113 स्त्री मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात 1 हजार 477 पुरुष व 791 स्त्री मतदार आणि शिराळा विधानसभा मतदार संघात 1 हजार 935 पुरुष व 1 हजार 46 स्त्री मतदार आहेत.
85 वर्षावरील 39 हजार 245 मतदार
जिल्ह्यायात 85 वर्षावरील 39 हजार 245 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात 2 हजार 144 पुरूष व 2 हजार 827 स्त्री मतदार, सांगली विधानसभा मतदारसंघात 2 हजार 345 पुरूष व 2 हजार 666 स्त्री मतदार, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 2 हजार 2 पुरूष व 2 हजार 751 स्त्री मतदार, खानापूर विधानसभा मतदारसंघात 2 हजार 494 पुरूष व 3 हजार 450 स्त्री मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 2 हजार 568 पुरूष व 3 हजार 527 स्त्री मतदार, जत विधानसभा मतदारसंघात 1 हजार 688 पुरूष व 2 हजार 163 स्त्री मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 1 हजार 560 पुरूष व 2 हजार 122 स्त्री मतदार, शिराळा विधानसभा मतदारसंघात 1 हजार 953 पुरूष व 2 हजार 985 स्त्री मतदार आहेत.


हे ही वाचा :
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर
Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!
राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान
मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त