Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड..अजून २६८ एमएलडी पाणी मिळणार, उद्योगांनी ट्रिटेड पाणी विकत घ्यावे – उपमुख्यमंत्री...

..अजून २६८ एमएलडी पाणी मिळणार, उद्योगांनी ट्रिटेड पाणी विकत घ्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

..आता आपले सरकार आले आहे, अपेक्षा पूर्ण होतील – आमदार महेश लांडगे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ‘आधुनिक वाल्मिकी’ या आदरयुक्त शब्दांनी ज्यांचा गौरव केला जातो. गीतकार, पटकथा, लेखक, नाट्य संगीत, भावगीत ईई सर्व क्षेत्रात त्यांचे गौरवशाली योगदान होते. गीत रामायनातील सुमधुर गीतांनी व बाबूजी सुधीर फडके यांच्या संगीताने राम कथा घरोघरी पोचली. रामायण आणि गदिमा यांचे अतूट सांस्कृतिक नाते या महाराष्ट्रात आहे. गदिमाना  दहा भाषा ज्ञात होत्या.गीत रामायण ही सर्वोत्तम कलाकृती अजरामजर गदिमा व बाबूजी यांनी केली. पिढ्या बदलत गेल्या, तरीही गीत रामायण ऐकल्याशिवाय आपला दिवस गोड होत नाही. अशा लेखकाचे नाव या नाट्यगृहाला दिल्यामुळे या शहराचा सांस्कृतिक गौरव वाढला आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्यगृह उदघाटन प्रसंगी व्यक्त केल्या.

..अजून २६८ एम एल डी पाणी या शहराला देऊ, उद्योगांनी ट्रिटेड पाणी विकत घ्यावे – फडणवीस

आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर विस्तारत आहेत, इथे ३ लाख नवीन फ्लॅट तयार होत आहेत, भविष्यकाळात या शहराच्या गरजा वाढणार आहेत. येथील नागरिकांना पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी अजून २६८ एमएलडी  पाणी पुरवठा दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना २६ किमी पाईप टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया एक महिन्यात  पूर्ण करावी यासाठी तातडीने प्रशासकीय नियोजन करावे. महापालिकेला संपादित जागा त्वरित वर्ग करावी, असे आदेश दिले आहेत. कोणत्याही अडचणी आल्या तर अधिकाऱ्यांनी मला सांगावे. कारण, या वाढत्या शहराची पाणी समस्या मला पूर्ण करायची आहे, आमदार महेश लांडगे पाण्यासाठी सतत पाठपुरवा करतात असे  सांगितले. त्यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह आणि मनपा प्रशासनाचे कौतुक केले. 

प्रक्रियायुक्त (Treated) पाणी या शहरातील ५० किमी परिसरातील उद्योगांनी विकत घ्यावे, त्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, राज्यसरकारने तसा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही. शहराचा शाश्वत  विकास (sustainable growth) होत आहे. इथे अपेक्षापूर्ती होत आहे, गावपण, गावकी आणि आधुनिकता याचा सुरेल संगम असलेले हे आधुनिक शहर अधिक सुंदर बनवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.

पाणी पुरवठा, नागरी सुविधांचे व्हिजन ठेवून कामाला सुरुवात – आमदार लांडगे

चाळीस वर्षात शहर खूप मोठे झाले, पाण्याची कमतरता भासू लागली. आम्हाला पवनेचे पाणी मिळत होते, तिथे पाऊस चांगला झाला तर आनंद व्हायचा. मात्र, दरवर्षी १० टक्के एवढा लोकसंख्या वाढीचा दर आहे. त्यामुळे मी पाणी पुरवठा, इतर नागरी गरजा याचे व्हिजन डाक्युमेंट २०१४ साली आमदार झाल्यावर तयार केले. २० वर्षाहून जास्त काळ रखडलेले प्रकल्प कार्यान्वित होतील यासाठी खासदार, मंत्री, विधिमंडळ येथे पाठपुरावा केला. सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न सुरू केले. आपले सरकार आल्यापासून प्रशासन सहकार्य करू लागले आहे. 

आपल्या सरकारकडून दुसऱ्या धरणातून पाणी मिळत आहे, याचा आनंद होत आहे. येथील युवक, क्रीडापटू, सर्व नागरिक यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे. देहू, आळंदी तीर्थक्षेत्रातील नद्यांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने विशेष योजना आम्हाला द्याव्यात,.  प्रशासकीय गतिमानता येण्यासाठी जिल्ह्याचे विभाजन करावे, अशा विविध मागण्या आ. लांडगे यांनी केल्या.

याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, माजी खासदार अमर साबळे, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Lic life insurance corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय