Saturday, May 4, 2024
Homeकृषीमनरेगा ठरतेय शाश्वत विकासाचा मार्ग; 'या' संघटनेचे काम कौतुकास्पद.

मनरेगा ठरतेय शाश्वत विकासाचा मार्ग; ‘या’ संघटनेचे काम कौतुकास्पद.

Add caption

जुन्नर : तालुक्यातील गावांसाठी मनरेगा वरदान ठरताना दिसत आहे. लॉकडाऊनची परिस्थिती असताना आदिवासी भागातील असंख्य कुटुंबांना हाताला काम नव्हते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मात्र लाभदायी ठरत असून अखिल भारतीय किसान सभा हे काम करण्यासाठी पुढाकार घेत आहे. 

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेला मनरेगा कायदा काय आहे, हे माहीत नव्हते. परंतु किसान सभेने गावात जनजागृती करुन जनतेचे प्रबोधन केले. तिशी दिवस काम मिळाले तर आम्ही इथंच काम करू, असा सुर आता गावात ऐकू येत आहे.

कायद्याच्या माहितीने ग्रामीण कष्टकरी जनतेत आनंद दिसत आहे, किसान सभा ‘एक तास मजुरांसोबत’ ही.मोहीम हाती घेणार असून जनतेला कायद्याची माहिती सांगणार आहे.

माणकेश्वर गावामध्ये ५५ मजुरांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळाला आहे. २ सप्टेंबर २०२० रोजी मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवडीचे माणकेश्वर गावामध्ये काम चालू आहे. किसान सभा मजूरांंचे प्रश्न समजावून घेऊन ते मार्गी लावताना दिसत आहे. आतापर्यंत भाषणे देणारे लोक ऐकले होते. परंतु जनतेचे काम करणारे तुमच्या सारखे तरुण तयार झाले पाहिजे, असे नागरिक बोलत आहे.

मनरेगा कायदा रोजगाराची हमी देतो,  काम मागणे, काम मिळणे, वेतन चिट्टी मिळणे हे हक्क देतो, मागेल त्याला मागेल तितके दिवस गावातच कामाची हमी देतो, रस्ते, क्रीडांगण, शाळा, अंगणवाडी, कार्यालय, जलव्यवस्थापन, कचरा व्यस्थापन, खत निर्मिती यासारख्या अनेक सुविधा निर्माण करता येतात, शेती, माती, वृक्षांचे संरक्षण, संवर्धन होते, गावामध्ये कायम स्वरूपी संसाधनाची निर्मिती होते, गावाचा शाश्वत विकास होतो, गावातच कामही मिळते आणि कामाचे दामही मिळते. आणि यातून कौटुंबिक, आर्थिक गरजाही पूर्ण होतात.

माणकेश्वर दौऱ्यामध्ये किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, कोंडीभाऊ बांबळे, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय) चे तालुका सचिव गणपत घोडे, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे सुनिल कोरडे सहभागी झाले होते.

यावेळी चावंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माधुरीताई कोरडे, सतिश कोरडे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर च्या गृहपाल अर्चना पवार यांच्यासह मजूर उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय