Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहिमोफिलियाचा प्रश्न विधिमंडळात मांडणार – आमदार उमा खापरे

हिमोफिलियाचा प्रश्न विधिमंडळात मांडणार – आमदार उमा खापरे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी आमदार उमा खापरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच हिमोफिलिया सोसायटी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष रशिद लीलानी, सेक्रेटरी विजय चोरडिया, हिमोफिलिया फेडरेशन आँफ इंडियाचे विकास उपाध्यक्ष रामू गडकर, मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ शैलजा माने, डी वाय पाटील तसेच डॉ. सुनिल लोहाडे, डॉ. राऊत, डॉ. ठाकरे उपस्थित होते.



या कार्यक्रमात बोलताना आमदार उमा खापरे म्हणाल्या, “हिमोफिलिया रुग्णांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. विशेषतः बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर येथील रुग्नांना पुरेशा औषधाअभावी अतोनात त्रास सहन करावा लागतो. या रुग्णांचे प्रश्न विधिमंडळात लक्षवेधी सुचना मांडून त्याद्वारे त्यांना न्याय मिळवून देणार.”



तत्पूर्वी, या कार्यक्रमात रामु गडकर आणि रशिद लीलानी यांनी हिमोफिलिया रुग्णांची गंभीर परिस्थिती आ. उमा खापरे यांच्यापुढे मांडली. हिमोफिलिया हा आनुवंशिकरित्या होणारा रक्तदोष असून यात रुग्णांना रक्त न गोठणे, सांध्यांना सूज येणे असा त्रास होतो. औषधांअभावी रक्तप्रवाह न थांबल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते. व उपस्थितांपैकी बीड, सोलापूर येथील रुग्णांनी उमा खापरेपुढे आपल्या व्यथा मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता भोसले यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. राऊत यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय