Saturday, April 20, 2024
HomeNewsविविध संस्था संघटनाद्वारे संभाजी गार्डन येथे ईद मिलन कार्यक्रम साजरा

विविध संस्था संघटनाद्वारे संभाजी गार्डन येथे ईद मिलन कार्यक्रम साजरा

पुणे : आपल्या देशात कायमच मिली-जुली संस्कृती राहिली आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण या द्वेषाने भरलेल्या समाजात प्रेमाचे दुकान उघडण्याची जबाबदारी आपली आहे असं मत मा. न्यायमूर्ती बी .जी. कोळसे पाटील यांनी मांडले. निमित्त होते लोकायत, मराठा सेवा संघ, भिम आर्मी (बहुजन एकता मिशन), मूलनिवासी मुस्लिम मंच, युनिक फाऊंडेशन आयोजित पैग़ाम-ए-अमन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



लोकायतच्या समन्वयिका अलका जोशी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाले कि आपल्या संत परंपरेने समता, बंधुता, मानवता यांसारख्या मूल्यांची जपणूक करत तिचा प्रचार-प्रसार केला. हीच मूल्यं आपल्या देशाच्या संविधानातही आली आहेत. म्हणूनच सर्व मिळून सर्व सण साजरे करणं ही आपली परंपरा राहिली आहे. याच भावनेतून प्रेम, शांती आणि सद्भावनेचा संदेश देणाऱ्या ‘पैगाम-ए-अमन’! हा गाणी, कविता आणि शेर-ओ-शायरीचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ईदनिमित्त आयोजित केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळदादा तिवारी,माजी नगरसेवक अविनाश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, नितीन जाधव, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, युनिक फाऊंडेशनचे विशाल जाफरी यांनीही आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहर अध्यक्षा मृणालिनी वाणी, भिम आर्मी(बहुजन एकता मिशन)चे दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, समाजकल्याण विभागाचे सुशीलकुमार शिंदे, अधिकारी म्हस्के, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अंगणवाडी कर्मचारी सभा, पथारी पंचायत, रिक्षा पंचायतचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.



पुणे पोलीस परिमंडळ १, डेक्कन पोलीस स्टेशन यांचे कार्यक्रमात विशेष सहाय्य लाभले. ईद मुबारकचा सेल्फी पॉईंट, पताकांची व लाईट माळांची सजावट, रांगोळीने कार्यक्रम अधिक उठावदार झाला. प्यार बाटते चलो, चल चलिए हि गाणी, मैं खीर तू शीरकुर्मा हा हिंदू-मुस्लिम संस्कृती एक्य सांगणारा रॅपही घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला. मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय