Saturday, May 18, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास, दंडही ठोठावला ;...

ब्रेकिंग : आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास, दंडही ठोठावला ; वाचा काय आहे प्रकरण !

Photo Credit : FB/ देवेंद्र भुयार

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१९ मधील एका प्रकरणात जिल्हा न्यायालयाने हि शिक्षा सुनावली आहे.

2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान वरुड तालुक्यातील बेनोडा गावाच्या पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक आणि पाणी बॉटल फेकून मारली होती. या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांच्या तक्रारीवरून आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायालयाने भुयार यांना तीन महिने कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 

आमदार देवेंद्र भुयार यांनी १५ हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय