Wednesday, May 1, 2024
HomeNewsम्हाडा ऑनलाईन अर्ज,25 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

म्हाडा ऑनलाईन अर्ज,25 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील 5915 घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (4 फेब्रुवारी) होती. मात्र, यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींना देखील अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर घरांची सोडत 7 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

म्हाडाच्या विविध योजनेतील 2594 सदनिका,20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2990 सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका अशा एकूण सदनिकांसाठी सोडत होत आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्यअंतर्गत 2925 घरे उपलब्ध आहेत.

अर्जासोबत रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, तसेच आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

सोडतीचे सुधारित वेळापत्रक

ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची अंतिम मुदत 25 फेब्रुवारी 2023
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2023
अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत 27फेब्रुवारी 2023
सोडतीसाठी अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध 3 मार्च 2023
सोडतीसाठी अर्जांची अंतिम यादी 5 मार्च 2023
सोडत 6 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय