Monday, November 25, 2024
Homeनोकरीबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 600+ पदांसाठी मेगा भरती 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 600+ पदांसाठी मेगा भरती 

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation), सार्वजनिक आरोग्य खात्या (Public Health Department) अंतर्गत परिचारिका पदाच्या एकूण 652 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (MCGM Recruitment) 

● पद संख्या : 652

● पदाचे नाव : परिचारिका (Staff Nurse) गट क

● शैक्षणिक पात्रता : 

1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10 + 2) उत्तीर्ण झालेला असावा. 

2) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (General Nursing & Midwifery ) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. (3 किंवा 3½ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा.) 

3) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे.

4) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 21.03.2023 रोजी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे पर्यत व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 18 ते 43 वर्षे पर्यंत.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● वेतनमान :  रु.35400 – 112400/- अधिकृत अनुज्ञेय भत्ते.

● अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात व अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 मार्च 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.

● निवडीची कार्यपध्दती :

1. एका उमेदवारास एकच अर्ज करता येईल. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरतीकरीता अर्ज करण्याची मुभा राहील.

2. सर्व प्रवर्गातील उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची खुला प्रवर्गाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात येईल.

3. खुला प्रवर्गाच्या पदासाठी निवड झालेली असेल अशा उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गाच्या उमेदवारांची खुला प्रवर्गातील पदावर नेमणूक करण्यात येईल.

4. परिचारीका या संवर्गाची अर्हता व सर्व अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार तसेच रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार व कप्पीकृत आरक्षणानुसार निवडयादी प्रसिध्द करण्यात येईल. 

5. निवड यादीतील उमेदवार विहित मुदतीत निवडीच्या कार्यवाहीकरीता हजर न झाल्यास गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय