Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत माऊलींचे वैभवी पूजा साहित्यास झळाळी

Alandi : आळंदीत माऊलींचे वैभवी पूजा साहित्यास झळाळी

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी कार्तिकी यात्रेसाठी माउली मंदिरातील श्रींचे चांदीचे पूजा साहित्य, भांडी, चांदीचे दोन पालख्या, प्रभावळ, श्रींचा मुख्य गाभारा, श्री सिद्धेश्वर मंदिर चांदीची आभूषणे, पालखी आदींना पॉलीश करून नवी झळाळी देण्यात आली. (Alandi)

यासाठी पुण्यातील विजय ज्वेलर्स मधील कारागिरांनी मोफत सेवी रुजू केली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी दिली. यासाठी सेवाभाव जपत कारागिरांनी विनाशुल्क सेवा रुजू केली. (Alandi)

यासाठी विजय ज्वेलर्सचे आशिष उदमवेर्णेकर, संतोष पवार, महेश मैंड, गजन्ना दहिवाळ, दिनेश आरणेकर, प्रभू पोतदार यांनी परिश्रम पूर्वक सेवा रुजू केली.

संबंधित लेख

लोकप्रिय