Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी- चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांबाबत आमदार लांडगे- महापालिका आयुक्तांची बैठक

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांबाबत आमदार लांडगे- महापालिका आयुक्तांची बैठक

पिंपरी चिंचवड : शहराच्या विकासाला चालना मिळण्यासाठी प्रलंबित लोकोपयोगी प्रकल्प त्वरित पूर्ण करा. महापालिकेने शहरातील प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावेत. आम्ही त्याला गती देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, आमदार महेश लांडगे आणि महापालिका यांच्यात आज मॅरेथॉन बैठक पार पडली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहराची स्वतंत्र इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा राबवणे, स्पर्धेसाठी प्रायोजक नेमणूक कोण असावेत ? याची माहिती घेण्यात आली. तसेच, महापालिकेने स्पर्धेचे प्रात्यक्षिक आमदार लांडगे यांच्यापुढे सादर केले.

या बैठकीत पुढील काळातील लोकोपयोगी कोणते प्रकल्प, शहरातील सोसायटीमध्ये एसटीपी धोरण, सोसायट्यांना पूर्णत्वाचा दाखला देतानाचे महापालिकेचे दायित्व, आगामी महापालिका अर्थसंकल्पात शाळा, शहरातील रुग्णालयासाठी स्वतंत्र बजेट, शहराच्या सिटी सेंटर आणि महापालिकेची नवीन इमारती, भोसरी कुस्ती केंद्राचा खर्च, नियोजन स्वतंत्र प्रकल्प अधिकारी ‘एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर’ अशा विविध मुद्द्यावर आमदार लांडगे यांनी चर्चा करून सूचना दिल्या. डिअर सफारी पार्क, मोशी क्रिकेट स्टेडियम हे दोन मोठे प्रश्न राज्य सरकार मार्फत मार्गी लावावेत अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी बैठकीत दिल्या.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय