Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकामगार संघटना संयुक्त कृती समितीचा कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

पुणे : केंद्राने पारित केलेले नवीन कामगार कायदे १ सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्या मध्ये लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या कामगार विरोधी निर्णया विरोधात निषेध आणि निर्धार नोंदवण्यासाठी बालगंधर्व रंग मंदिर पासून कामगार आयुक्त कार्यालय शिवाजीनगर पुणे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, कॉम्रेड अजित अभ्यंकर सीटू, कॉम्रेड वसंत पवार, कॉम्रेड मोहन पोटे, कॉम्रेड अनिल रोहम आयाटक, कॉम्रेड अरविंद जक्का आयटक, नितीन आकोटकर, किरण पेडणेकर, कुंदन खनका आयटक, मनोहर गडेकर इंटक, कॉम्रेड गणेश दराडे, दिलीप पवार श्रमिक एकता महासंघ, ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे आणि मारुती भापकर हे यांनी याप्रसंगी कामगारांना संबोधित केले.

कामगारांनी येणाऱ्या काळात सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध मोठे जन आंदोलन उभे करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय