लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना आज मराठा आंदोलकांनी घेराव घातला. जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेसाठी लातूर दौऱ्यावर होते आणि जय क्रांती महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जात असताना ही घटना घडली. आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली, मात्र पाटील यांनी यावर भूमिका घेण्याचे टाळले, त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले.
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाने जोर पकडला असून, जयंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना जयंत पाटलांपासून दूर केले. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही आंदोलकांनी अशाच प्रकारे घेराव घातला होता.
Jayant Patil
शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान, लातूर, निलंगा, अहमदपूर येथे मराठा समाजाच्या बांधवांनी आपली भावना व्यक्त केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. (Jayant Patil)
या घटनेमुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या