Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकाळभोरनगर येथील अनेकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

काळभोरनगर येथील अनेकांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीमध्ये डॉ. अनिल राॅय यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे, त्यांच्या नेतृत्वात काळभोर नगर भागातील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.

यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष किसन चावरिया, डॉ.अजय काळे, सुनील लखन, विजय सावरिया, निलेश रेवन, जयाताई परमार, बसवराज नाटेकर, किरण उंबरे, दीपक कोटीयाना, गोपालजी चावरीया, श्रीकांत जाधव , अशा अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

त्यांचा प्रवेश आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आप संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉक्टर अमर डोंगरे, अशोक लांडगे, सिताताई केंद्रे, के.टी बारापत्रे, स्मिता पवार, अनुप शर्मा, सुरेश बावनकर, भिम मांगडे, माया सांगवे, महेश बिराजदार, वहाब शेख, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी किसन चावरीया यानी बोलतांना म्हटले, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे अतिशय चांगल काम आहे. दिल्लीमध्ये महिलांसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत, शाळा, शिक्षण, पाणी, वीज, यावरती मोठ्या प्रमाणावर दिल्लीत केजरीवाल सरकारने काम केले आहे. दिल्लीमध्ये आमचा वाल्मिकी समाज आम आदमी पार्टीला मोठ्या प्रमाणावर जोडला गेलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्येही वाल्मिकी समाज मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळात हा समाज आम आदमी पार्टीला जोडला जाईल असा विश्वास त्यांनी दिला.

PIMPARI REDI PAJHETION
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय