Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

एस.एम.जोशी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम.जोशी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे सिमाशुल्क विभागाचे उपायुक्त व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभयसिंह फाळके (IRS) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षन संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे वू महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या संकल्पनेमधून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यशस्वी झालेल्य विद्यार्थ्यांमध्ये आनंद आवारे (पोलीस उपनिरीक्षक), रमेश शेलार (पोलीस उपनिरीक्षक), सिमा किंकर (पोलीस उपनिरीक्षक), छाया कानपिळे (पोलीस उपनिरीक्षक), निरंजन घोडके ( सार्वजनिक बांधकाम विभाग), अमर पवार (जलसंपदा विभाग), आचल काळे (सी.ए.), शीतल कोरडे (सी.ए.), अनिकेत थोरात (नायब तहसीलदार), शितल बांदल (सहाय्यक रजिस्ट्रार को. ऑप.सो.), केदार बारबोले (सहाय्यक निबंधक) संतोष जगताप (मंत्रालय लिपिक), सचिन ढवळे (वैज्ञानिक सहाय्यक), या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरसिंह फाळके म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशावर समाधान न मानता यापुढील उच्च पदे मिळविण्याठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवत काम करताना स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उमटवून आई-वडील व शिक्षकांचे नाव मोठे करावे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सत्याला जवळ करावे. विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात कार्य करावे. प्रामाणिकपणे कष्ट केल्यास त्यामधून आत्मिक समाधान मिळते. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या गोष्टींची संगत धारावी. विद्यार्थ्यांनी भौतिक गोष्टीमध्ये न अडकता आत्मिक समाधान शोधावे. असे मत अभयसिंह फाळके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिलीप तुपे म्हणाले, विद्यार्थ्याने कितीही मोठे पद मिळविले तरी त्याने आपले पाय जमिनीवर ठेवून, समाजसेवा करावी. असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा चालवणारी सुसंस्कृत व मोठ्या मनाची पिढी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी नाविन्याचा शोध घेवून भारत देशाचे नेतृत्व करावे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. संजय जगताप, डॉ. किशोर काकडे व अनिता शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी तर आभार प्रा. ए. डी. भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

PIMPARI REDI PAJHETION
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय