Thursday, April 25, 2024
Homeराज्यसमाज व्यवस्थेमध्ये चांगले विचार रुजवण्यासाठी भारत जोडो यात्रा – कन्हैयाकुमार

समाज व्यवस्थेमध्ये चांगले विचार रुजवण्यासाठी भारत जोडो यात्रा – कन्हैयाकुमार

हिंगोली : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे काल हिंगोली येथे नागरिकांनी जोरदार स्वागत केले.यात्रे मध्ये विद्यार्थी,युवक,महिला,शेतकरी,निवृत्त लोक सामील झाले होते. हिंगोली येथे दाती फाट्यावर चहापान करत असताना युवक काँग्रेसचे नेते कन्हैय्याकुमार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, ही निवडणूक प्रचार यात्रा नाही. तसे असते तर यावेळी आम्ही गुजरात मध्ये असतो. ही राष्ट्रीय एकात्मतेची विचार यात्रा आहे. यात्रेत कोणत्याही एका पक्षाचे लोक नाहीत, या यात्रेतून राष्ट्रीय एकात्म भावना वाढवण्यासाठी विचारांची पेरणी करायची आहे.

बदल हा पृथ्वीचा नियम आहे.देशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. ही समाजवादी विचारांची प्रबोधन यात्रा आहे, असे कन्हैया कुमार यांनी हिंगोली येथे सांगितले.

प्रमुख नेते यात्रेत असताना गुजरात निवडणुकीचे काय?’ असा सवाल विचारला असता ते म्हणाले की, “राजकारणासाठी ही यात्रा नाही. निवडणुकीचे काय आम्ही हरणार किंवा जिंकणार. बस एवढेच. पण, सध्या आम्हाला समाज व्यवस्थेसाठी विचारांची पेरणी करायची आहे. ते महत्त्वाचे आहे.”

तसेच, यात्रेत सहभागी होणारे कुठल्याही एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे प्रेमी, एका समाजाचे लोक नाहीत. सर्वसमावेशक व सर्व समाजातले लोक आहेत. काँग्रेस हा पक्ष नसून ही एक विचारधारा आहे. समाजवादी विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी ही यात्रा असल्याचं सांगत आता थांबायला नको अजून खूप चालायचे असे म्हणते ते उठले आणि चालायला लागले.

‘भारत जोडो यात्रेमुळे बदल घडेल का?’ असा सवाल त्यांना विचारला. “बदल हा पृथ्वीचा नियम आहे. बदल हा होतोच. पण, बदलासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या यात्रेमुळे बदल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही यात्रा लोकांना भावनिकरीत्या जोडत आहे. याकडे तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करून पाहा. समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिक यात सहभागी होत आहेत. त्यात शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचाही सहभाग आहे. यात मतदार जोडण्याचा कुठल्याही प्रयत्न नाही, असेही त्यांनी सांगितलं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय