Home ताज्या बातम्या मोठी बातमी : आगीच्या अफवेमुळे प्रवाशांच्या धावत्या रेल्वेमधून उड्या, समोरच्या एक्सप्रेसने अनेकांना...

मोठी बातमी : आगीच्या अफवेमुळे प्रवाशांच्या धावत्या रेल्वेमधून उड्या, समोरच्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

जळगावमधील परांडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना: अफवेमुळे अनेकांचा मृत्यू Major accident in Paranda railway station Jalgaon Train

Jalgaon Train Accident : परांडा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लखनऊहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर अनेक प्रवाशांनी घाबरून रेल्वेमधून उड्या मारल्या. मात्र, समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काय घडले नेमके? (Jalgaon Train Accident)

परांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत असताना मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून आगीच्या ठिणग्या उडाल्या, ज्यामुळे डब्यात आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी उड्या मारायला सुरुवात केली. यावेळी ३५ ते ४० प्रवासी रेल्वे रुळांवर आले आणि समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक प्रशासनाची प्रतिक्रिया

घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने मदत पुरवण्यात आली. “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे, आणि आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करू,” असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

अपघातानंतर जळगावचे प्रांताधिकारी आणि कलेक्टर १५-२० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मदत कार्य जलदगतीने सुरू आहे.

हे ही वाचा :

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

महाराष्ट्रावर कर्जाच्या बोजा, सरकारच्या तिजोरीवर ₹ 96,000 कोटींचा भार

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

LIC कडे ₹880 कोटींची दावा न केलेली रक्कम; तुमची रक्कम असू शकते का?

पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शिरकाव, वाचा काय आहे नेमका आजार

जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार

धक्कादायक : ज्योतिबा डोंगरावर प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा, भाविकांच्या जीवाशी खेळ!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती

Exit mobile version