Majalgaon: कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचा दिवसाढवळ्या बळी जात असताना, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट, प्रस्थापित आणि घराणेशाही जपणाऱ्या राजकीय पक्षापासून सावध होणे गरजेचे आहे, राज्यात शेतकरी हवालदिल झालेला असताना, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या आणि शेतकऱ्याची शेती अंबानी आदाणीच्या घशात घालू पाहणाऱ्या भांडवलदार धार्जिन्ये सरकार आणि घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवून शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेत मांडण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास बळ द्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी माली पारगाव येथे दि.२३आक्टोंबर रोजी प्रचार दौऱ्यात बोलताना केले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई मुंजा पांचाळ, भाई राधाकृष्ण पांचाळ, निलाराम टोळे, श्रीराम कोरडे यांनी घराणेशाही, महागाई, वाढत्या भ्रष्टाचारा बदल चिंता व्यक्त केली, यावेळी शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती.
Majalgaon
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल
पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती