अधिवेशनामध्ये विविध ठराव मंजूर करत नवीन कार्यकारणी जाहीर
नाशिक : दि.१० ते १२ फेब्रुवारी ३ दिवस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन(आयटक) सलग्न २० वे त्रैवार्षिक अधिवेशन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड अतुल कुमार अंजान महासचिव अखिल भारतीय किसान सभा, कॉम्रेड सदरुदिन राणा अध्यक्ष ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज, तेलंगाना, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ व राजस्थान या प्रदेशातील वीज कामगार नेत्यांनी अधिवेशनाला संबोधित केले.
अधिवेशनामध्ये छगन भुजबळ, आ.माणिकराव कोकाटे, आ.दिलीप बनकर, माजी आमदार हेमंत टकले, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) नेते श्याम काळे, राजू देसले, महावितरण कंपनीचे मुख्यअभियंता धनंजय औधेकर (कल्याण), सुनील काकडे (भांडुप), दीपक कुमठेकर (नाशिक), राजेंद्र पवार (पुणे), सुनील काकडे (भांडुप) महापारेषण कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भारत पाटील व मुख्य महाव्यवस्थापक सुधीर वानखेडे हे उपस्थित होते. दिवाकर दळवी संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी प्रतिनिधी सत्राला संबोधित केले.
अधिवेशनाला श्रीमती आभा शुक्ला प्रधान ऊर्जा सचिव, विजय सिघंल (वितरण), दिनेश वाघमारे (पारेषण), डॉ.पी.अनबलगन (निर्मीती) कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, प्रसाद रेशमे (वितरण), सुगत गमरे (पारेषण) व भिमाशंकर मंता (निर्मिती), मुख्यऔधौगिक संबंध अधिकारी संजय ढोके (वितरण), भरत पाटील (पारेषण), पुरुषोत्तम वारजूरकर (निर्मिती), ललित गायकवाड, भूषण कुलकर्णी, आंनद कोंत या अधिकाऱ्याचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले.
तीन दिवस सुरू असलेल्या अधिवेशना मध्ये ५३१ प्रतिनिधी सहभागी होते. अधिवेशना मध्ये मंजूर करण्यात आलेले ठराव केंद्र सरकारच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाला विरोध, सुधारित विद्युत कायदा २०२२ ला विरोध, केंद्र सरकारने रद्द केलेले कामगार कायदे बहाल करा व नवीन तयार केलेले कामगार कायदे रद्द करा, बँक, एल आय चे खाजगीकरण चा निषेध, महाराष्ट्रात वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रा मध्ये समांतर वीज वितरणाचा परवाना मागणारे खाजगी भांडवलदार अदानी व टोरेंटो यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय, तिन्ही वीज कंपन्यातील ४२००० च्या वर रिक्त असलेल्या जागा भरण्याची मागणी, रिक्त जागा भरताना कंत्राटी व आऊटसोर्सिंग म्हणून काम करणाऱ्या ४० हजाराच्या वर कामगारांना कायम करावे. नवीन भरती मध्ये वयाची व शैक्षणिक पात्रता अट शिथिल करून प्रथम प्राधान्य देऊन कंत्राटी कामगारांना सामावून घ्या. अशिक्षित कामगारांना रोजंदारी कामगाराची पद्धत सुरू करून सेवा जेष्ठतेनुसार सामावून घ्या. वाढलेल्या वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन शाखा, उपविभाग, विभाग कार्यालयाची निर्मिती करा. महावितरण कंपनीत सुरू असलेली इंनपॅनमेट पद्धत तात्काळ बंद करा. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीची कार्यक्षमता वाढवण्याकरीता संघटना बरोबर चर्चा करून कृती कार्यक्रम निश्चित करा. विद्युत, उपकेंद्र, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक यांचा ३ वर्षाचा प्रशिक्षण कालावधी सामान्य आदेश-७४ च्या लाभ व इतर लाभासाठी गृहीत धरा. महापारेषण कंपनी मधील कर्मचारी व अभियंते यांचे कामाचे स्वरूप निश्चित करा. तिन्ही वीज कंपन्यातील अंतर्गत भरती करीता राखीव असलेले पदे अंतर्गत अधिसूचना तात्काळ काढून भरतीची प्रक्रिया पूर्ण करा. मयत कामगाराच्या वारसाची नोकरी देण्याची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा. वीज कामगारांना पेन्शन योजना लागू करा, ईपीएफ-९५ पेन्शनर ना दरमहा 9 हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता सह लागू करा. मोफत आरोग्य सुविधा द्या, वीज कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजा मध्ये सुरू असलेला राजकीय हस्तक्षेप तात्काळ बंद करा. वीज कंपन्यांना आर्थिक बळकती देण्याकरीता राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईनचा दर्जा देण्यात यावा. आयटक नेते ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी व त्यामागील सूत्रधारांना त्वरित अटक करा. देशभर जुनी पेन्शन योजना लागू करा आदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
महाअधिवेशनाने निवड केलेले केंद्रीय पदाधिकारी. :
1. अध्यक्ष : कॉ.मोहन शर्मा (नागपूर),
2. कार्याध्यक्ष :कॉ.सी.एन.
देशमुख (खामगाव)
3. उपाध्यक्ष : बी.एल.वानखेडे (औरंगाबाद), एस.आर.खतीब (नाशिक), सी.एम.मौर्य (नागपूर), सल्लाउददीन नाकाडे (रत्नागिरी), ए.डी.सनगाडे (अकोला), भिमाशंकर पोहेकर (पुणे).
4. सरचिटणीस कृष्णा भोयर (पनवेल)
5. अति.सरचिटणीस – महेश जोतराव (सांगली)
6. उपसरचिटणीस – अरुण म्हस्के (नाशिक), एस.एम.फराक्टे (पोफळी), श्रीमंत खरमाटे (तासगाव), बी.एस.काळे (उस्मानाबाद).
7. खजिनदार : सागर मळगे (कोल्हापूर), अब्दुल सादिक (नागपूर)
8. संयुक्त सचिव : माधव वरवडेकर (रत्नागिरी), बी.के.पवार (कुडाळ), जी.एच.वाघ (मालेगाव), पी.व्ही.नायडु (नागपूर), लिलेश्वर बनसोड (ठाणे), औदुंबर कोकरे (कल्याण), शैलेश तायडे (खामगाव), संजय नागापुरे (चद्रंपूर), विरेंद्र पाटील (जळगाव), पंडीतराव कुमावत (नाशिक), विवेक काकडे (गोंदिया), विलास कोल्हे (सोलापूर), दत्तात्रय काबंळे (वाशी), ईश्वर वाबळे (पुणे), रिक्त जालना
9. ऑडिट कमिशन : जे.एन.बाविस्कर (चाळीसगाव), जयंत पाटील (कोल्हापूर), बाळासाहेब दंडीले (नागपूर), रिक्त (नागपूर)
10. महिला आघाडी : अध्यक्ष – भारती भोयर (पनवेल), सचिव – मंजू वर्मा (कळवा), सहसचिव – श्रीमती राजश्री फडके (रत्नागिरी), सहसचिव – श्रीमती प्रगती खापर्डे (नागपूर), सहसचिव – प्रीती बहिरूपी वानखेडे (अमरावती)
11. पेन्शनर्स असोसिएशन – एम.आर.जाधव (नादेंड)
12. केंद्रीय कार्यकारी सदस्य :
• एकूण ४५ केंद्रीय कार्यकारणी सदस्य पुरुषांची निवड करण्यात आली.
• एकूण १५ केंद्रीय महिला सदस्यांची निवड करण्यात आली.
• केंद्रीय सल्लागार : एकूण १२ केंद्रीय सल्लागारांची निवड करण्यात आली.
13. कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार सेल – अध्यक्ष – कॉम्रेड एन.वाय.देशमुख (खामगाव), सचिव – कॉम्रेड नाना सोनवलकर (सातारा), राज्य संघटन सचिव – कॉम्रेड दत्ता पाटील (सांगली), सहसचिव – कॉम्रेड जे.एम.जल्लारे (परभणी), सहसचिव – कॉम्रेड अक्षय शिवणकर (रत्नागिरी)
14. कल्याण निधी ट्रस्ट – कॉम्रेड जे.आर.पाटील (कल्याण)
15. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंच : अध्यक्ष – काॅ.माधव जोगळेकर(कल्याण), सचिव – व्हि.डी.धनवटे (नाशिक)