Saturday, October 12, 2024
Homeग्रामीणराज्यात 370 कोटीच्या वीज चोऱ्या पकडल्या ; धडक कारवाई !

राज्यात 370 कोटीच्या वीज चोऱ्या पकडल्या ; धडक कारवाई !

पुणे: महावितरणच्या भरारी पथकांनी 2021-22 मध्ये राज्यात तब्बल 557 दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणली आहे. उच्च व लघुदाब वर्गवारीत 22 हजार 987 ठिकाणी 317 कोटी 45 लाख रुपयांच्या वीज चोर्‍या पकडल्या आहेत.त्यापैकी 172 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. यामुळे महावितरणची वीजहानी कमी करण्यासोबत महसुलामध्ये वाढ होण्यास मदत होत आहे.

वीजचोरी विरोधात धडक कारवाई करण्यासाठी राज्यात परिमंडलस्तरावर 8, मंडलस्तरावर 20 तर विभागीयस्तरावर 40, असे एकूण 71 पथके तैनात केली आहेत. यात 345 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील मंडलस्तरावरील 20 पथके नोव्हेंबरमध्ये नव्याने स्थापन केली आहेत. आतापर्यंत 2021-22 मध्ये सर्वाधिक 557.53 दशलक्ष युनिटची वीजचोरी उघड केली आहे. याआधी 168 दशलक्ष युनिटची वीजचोरी पकडली आहे. 2022-23 मध्ये 600 पेक्षा अधिक दशलक्ष युनिट वीजचारी उघड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे कठोर कारवाई सुरू झाली आहे. विभागीयस्तरावर देखील अतिरिक्त पथके देण्यात यावी, असे आदेश दिल्यामुळे वीज चोरीविरूध्द महावितरणने अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

‘पुणे तेथे काय उणे !’ वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून पुरूषांनी साजरी केली वटपौर्णिमा

10 वी / 12 वी / ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे 338 पदांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय