Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यपुरुषांचे बाबा बनण्याचे योग्य वय "हे" ; यानंतर शुक्राणू पडतात कमजोर, प्रजनानासंबधी...

पुरुषांचे बाबा बनण्याचे योग्य वय “हे” ; यानंतर शुक्राणू पडतात कमजोर, प्रजनानासंबधी अधिक जाणून घ्या !

पुणे : पुरुषांना असं वाटतं की, जेव्हा मूल होतं तेव्हा त्यांच्या वयाचा काही फरक पडत नाही. परंतु, असं होत नाही. कारण, पुरुषांच्या वयाबरोबर शुक्राणूंची संख्या (Sperm Count) आणि गुणवत्ता कमी होते.

जैविक दृष्टिकोनातून, पुरुषाचे वय 20-30 वर्षे वडील होण्यासाठी पुरेसे आहे. या वयात आरोग्य आणि वैद्यकीय स्थिती सामान्यतः चांगली असते. तथापि, पुरुषांना 50 किंवा त्याहून अधिक वय असताना मुलं होणं कठीण होतं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एक माणूस वयाच्या 92 व्या वर्षी बाप झाला. तरीही, संशोधकांच्या मते, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना यश मिळण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर वाढत्या वयात वडील बनल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात.

आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

पुरुष शुक्राणूंची निर्मिती करणे कधीही थांबवत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांच्याकडे महिलांसारखे बॉयोलॉजिकल क्लॉक नाही. पुरुषाचे वय वाढत असताना, त्याच्या शुक्राणूमध्ये अनुवांशिक बदल होतात आणि त्याच्या शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान होऊ शकते. याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे होणाऱ्या बाळाला मेडीकल समस्या उद्भवू शकते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, वय जास्त असताना वडील बनल्याने मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटलची समस्या उद्धभवण्याची शक्यता जास्त असते. 2010 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या मुलांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर विकसित होण्याचा धोका सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे.

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा


विशेष लेख : चला तर समजून घेऊ – मासिक पाळी

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सकस आहार घ्यावा. तुमचे वजन जास्त असल्यास, काही किलो वजन कमी करावे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, शुक्राणूंच्या संख्येसाठी अँटिऑक्सिडंट्स समृद्ध आहार देखील मदत करू शकतो. तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी अल्कोहोल आणि धूम्रपानापासून दूर रहा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय