Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यातील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाखाच्या घरात; वाचा आजची प्रत्येक जिल्ह्यातील आकडेवारी

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाखाच्या घरात; वाचा आजची प्रत्येक जिल्ह्यातील आकडेवारी

मुंबई  : –  राज्यात कोरोनाचे आज ७ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. आज १० हजार ३२० नविन रुग्ण आढळले असून सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज नवीन कोरोना बाधितांची संख्या १० हजार ३२० अशी आहे तर २६५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.

आजचा कोरोना बाधितांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०८५ (५३), ठाणे- २३४ (१२), ठाणे मनपा-३१९ (१३), नवी मुंबई मनपा-४१२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३७६ (१३), उल्हासनगर मनपा-५० (९), भिवंडी निजामपूर मनपा-२७ (१), मीरा भाईंदर मनपा-१४०(४),पालघर-१४१ (४), वसई-विरार मनपा-२०० (१), रायगड-२२७ (७), पनवेल मनपा-१५०(३), नाशिक-१३१, नाशिक मनपा-३१३ (५), मालेगाव मनपा-११ (१), अहमदनगर-१६४ (१), अहमदनगर मनपा-१५९, धुळे-९८ (१), धुळे मनपा-१०८, जळगाव-२५४ (३), जळगाव मनपा-१३४, नंदूरबार-४१, पुणे- ४५२ (१६), पुणे मनपा-१६३५ (३०), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (२५), सोलापूर-१६१ (६), सोलापूर मनपा-९५ (२), सातारा-१६८, कोल्हापूर-३४२ (६), कोल्हापूर मनपा-१४७ (४), सांगली-७३ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८० (३), सिंधुदूर्ग-१०, रत्नागिरी-९ (१), औरंगाबाद-९८ (२), औरंगाबाद मनपा-६६ (२), जालना-२७ (१), हिंगोली-३, परभणी-४१ , परभणी मनपा-१४ (२), लातूर-६६ (१), लातूर मनपा-६२ (२), उस्मानाबाद-११३ (२), बीड-४० (१), नांदेड-७४ (५), नांदेड मनपा-९ (२), अकोला-३५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-८, अमरावती मनपा-४२ (१), यवतमाळ-८८, बुलढाणा-१०२ (६), वाशिम-२५, नागपूर-२१२ (१) , नागपूर मनपा-१२९ (२), वर्धा-१३, भंडारा-४, गोंदिया-१७, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-५, इतर राज्य २१.

संबंधित लेख

लोकप्रिय