Home ताज्या बातम्या Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासंदर्भात मोठी बातमी समोर

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासंदर्भात मोठी बातमी समोर

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार Maharashtra CM Devendra Fadnavis will take oath as Chief Minister for the third time

Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. गेल्या 11 दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत गोंधळ  सुरू होता. आता अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबईत झालेल्या भाजपा विधिमंडळ गटाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे उपस्थित होते. (Maharashtra CM)

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीतही फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबईतील आझाद मैदान येथे शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, विधिमंडळ गटाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Maharashtra CM

हे ही वाचा :

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी

गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…

NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

Exit mobile version