Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी: कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैनमध्ये अटक

मोठी बातमी: कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैनमध्ये अटक

(उज्जैन) :- गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आठ पोलिसांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैनमध्ये अटक करण्यात आली आहे. उज्जैनच्या महाकाळ मंदिरात विकास दुबे दर्शनासाठी गेले असता तेथील रक्षकांनी त्यांना ओळखले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तिथेच रोखत मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अटक केली. 

विकास दुबे कोण आहे? वाचा सविस्तर!

      गुरुवारी सकाळी आठ वाजता तो महाकाळ मंदिर संकुलात पोहोचला, तेथील प्रसाद दुकानदारास संशयास्पद वाटल्या नंतर त्याने मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले. पूजा करुन तो बाहेर आला, तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला आडवले. दुसर्‍याच्या नावाने बनलेला आयडी दाखवल्या नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याची अधिक चौकशी केली. नंतर त्याला पोलिस स्टेशनला आणले असता त्याने कबूल केले.

पोलिसांसाठी हे एक मोठे यश आहे, विकास दुबे हा क्रूर हत्यारा आहे. संपूर्ण मध्य प्रदेश पोलिस सतर्क होते. त्याला उज्जैन महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली आहे. आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांना कळविले आहे.

– नरोत्तम मिश्रा, मध्य प्रदेश मंत्री –

विकास दुबे उज्जैन महाकाळ मंदिरात जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले तसेच पोलिसांना कळविण्यात आले, त्याला धमकावल्यानंतर त्याने आपली ओळख कबूल केली.  त्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि चौकशी सुरू आहे.

 आशिष सिंग, उज्जैन जिल्हाधिकारी –

       दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला अटक केली.  उज्जैन पोलिस अजूनही त्याच्याकडे चौकशी करत आहेत. यूपी पोलिसांना याबाबत कळविण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय