पिंपरी चिंचवड : मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य मेडिको चिंचवड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांसाठी विश्व हिंदू परिषदकडे औषधे, सॅनिटाझर व मास्क वितरित करण्यात आले. मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुप व सहकाऱ्यांच्या वतीने जवळपास गेली १८ वर्षे पासून हा उपक्रम अविरत सुरू आहे.
माजी राज्यमंत्री लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे राजेश पिल्ले, चैतन्य ग्रुपचे पोपट बच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख यशवंत देशपांडे, विजय देशपांडे, भास्कर गोडबोले, पी.एन.पुजारी, बाळासाहेब मोकाशी आदी मान्यवरांकडे सुपूर्द करण्यात आली.
माजी भाजपा महिला प्रभाग अध्यक्षा रोहिणी बच्चे, सुषमा कोरे, गणेश बच्चे, मनोज भिवरे, श्रावणी बच्चे, आसावरी बच्चे, राजेश म्हसकर, अर्चना बच्चे, चित्रा काजळे, नीता आचार्य, प्राची पानसे, सोनाली कुलकर्णी, जय वानखेडे, मिहीर आदींनी या उपक्रमात पूर्णवेळ सहभाग घेतला.
अजय दर्डा, मारुती हाके, अशोक शिंगाडे,पियुष गुप्ता, संतोष कंद, दिपक गारगोटे, निलेश गाडगे, उज्वल रावळ आदींनी या उपक्रमात विविध प्रकारे सढळ हस्ते मदत केली. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, भाजपा शहर सचिवमधुकर बच्चे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. गणेश बच्चे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
– क्रांतिकुमार कडुलकर