Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडलोकायतकडून वस्ती पातळीवर करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

लोकायतकडून वस्ती पातळीवर करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

पुणे : बदलत्या काळानुसार व्यवसायाभिमुख शिक्षण घेणं जास्त गरजेचे आहे. त्यानुसारच १० वी, १२ वी नंतर व्होकेशनल कोर्सेस कडे विद्यार्थ्यांचा प्रदेश घेण्याचा कल वाढत चालला आहे. असे मत करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक प्रा.स्वप्नील फुसे यांनी केले. निमित्त होते लोकायत नागरी समिती आयोजित मोफत करिअर व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे.



हि कार्यशाळा शनिवार १७ जून २०२३ रोजी विरेश्वर महाराज नरेगल मठ, वडारवाडी व हिरामण जाधव समाजमंदीर, गंज पेठ येथे घेण्यात आली. या कार्यशाळेत डिप्लोमाच्या शाखा, आयटीआय कोर्सेस, शिक्षणा सोबत काम, शिष्यवृत्ती आणि इतर वेग वेगळे कौशल्य शिकण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत मांडणी केली.

१० वी, १२ वी पास झालेल्या विद्यार्थांचा सत्कार मठाचे ज्येष्ठ सभासद शंकर डोंगरे यांच्या हस्ते तरुणांनो विचार कराल तर हे पुस्तक देऊन करण्यात आला. वस्ती पातळीवरील रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला अशा हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गातील कुटुंबीयांची मुल मुली सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय