Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचला देऊ मनोज जरांगे पाटलांना साथ – युवराज दाखले

चला देऊ मनोज जरांगे पाटलांना साथ – युवराज दाखले

मुंबई : एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याच्या अनुषंगाने मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण मिळण्या कामी मराठा समाजातील प्रमुख प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 17 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे यासंदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम देण्याकरिता 14 ऑक्टोंबर रोजी सकल मराठा बांधवांनी भव्य असा मेळावा आयोजित केलेला आहे.

या मेळाव्याला सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने सक्रिय असा जाहीर पाठिंबा लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी व्यक्त करून सकल मातंग समाज त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला सक्रिय असा सहभाग नोंदविण्याचा सूचना लोकसेवक युवराज दाखले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय