Friday, May 17, 2024
HomeNewsअमरनाथमध्ये गुहेजवळ मोठी ढगफुटी, १५ भाविकांचा मृत्यू

अमरनाथमध्ये गुहेजवळ मोठी ढगफुटी, १५ भाविकांचा मृत्यू

जम्मू काश्मीर : अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी (Amarnath cloudburst) झाली आहे. ही ढगफुटी गुहेजवळच झाली आहे. या ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे. या दुर्घटनेत पंधरा भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात काही लंगर आणि तंबू वाहून गेले आहेत. या घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

या ढगफुटीचा व्हिडिओ आत समोर आला आहे. या व्हिडिओत डोंगरातून पाण्याचा मोठा लोंढा वाहत आहे. प्रचंड वेगाने पाणी दगरीत कोसळत आहे. अंगावर काटा आणणार असा हा व्हिडिओ आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा ३० जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. ४३ दिवस चालणाऱ्या या यात्रेची ११ ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. ही यात्रा सुरू असताना सध्या अमरनाथ मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय