Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडफायनान्स कंपन्याची गुंडगीरी थांबविण्याची लाल बावटा रिक्षा युनियनची पोलीस आयुक्तांकडे मागणी

फायनान्स कंपन्याची गुंडगीरी थांबविण्याची लाल बावटा रिक्षा युनियनची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड : फायनान्स कंपन्याची गुंडगीरी थांबविण्याची मागणि लाल बावटा रिक्षा युनियनच्या वतीने पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात हजारो बेरोजगार तरुणांनी आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. या कामगारनगरीत हजारो लोकांना सेवा देण्याचे काम रिक्षावाले करत आहेत. 

मागील दीड वर्षापासून कोविडच्या आपत्ती मुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले असल्यामुळे साहजिक हप्ते थकले आहेत. सर्व फायनान्स कंपनीच्या दादागीरी, गुंडगीरी, असंवेदनशीलता या कारणांमुळे सर्व रिक्षाचालकांचे जीणेहराम झाले आहे.

कोरोनामुळे असंख्य रिक्षाचालकांचे जे वेळोवेळी नियमित वेळेत हफ्ते भरत होते, त्यांची हि कमाई कमी झाली आहे. परिणामी रिक्षाचालकांना उदरनिर्वाह करणे कठिण होऊन बसले आहे. रिक्षाचालकांचे मुलांचे शिक्षण थांबले आहे. रिक्षाचालकांचे संपुर्ण आर्थिक चक्र पूर्णपणे कोलमडले आहे, असेही म्हटले आहे.

खाजगी फायनान्स कंपन्याच्या अनधिकृत गुंडाकडून थकीत कर्ज असलेल्या रिक्षा चालकांकडून कारवाईचा दंडका उगारुन व दंडेलशाही करुन हफ्त्याच्या पैशाच्या चारपट पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिक्षा या बेकायदेशीरपणे अडवून शिवीगाळ करुन ताब्यात घेतल्या जात आहेत. कर्जाच्या हफ्त्यासह आमचीही वसुली फी द्यावी लागेल अशी दाटावणी केली जात आहे. वास्तविक अशा प्रकरणात पोटावरचे जीव असणा-या, कर्ज घेऊन चार पैसे कमवून रिक्षा घेणारे रिक्षाचालकांची अवस्था दिवसें दिवस गंभीर होत चाललेली आहे. परंतु या सर्व गोष्टींचा फायदा या फायनान्स कंपन्या उचलत आहेत. 

अनेक रिक्षा ओढुन नेऊन रिक्षावाल्यांमध्ये नैराश्य वाढले आहे. बेरोजगारीच्या खाईत ढकलण्याचे काम या कंपन्या व त्यांचे भाड्याचे गुंड करीत आहेत. या कारणांमुळे नैराशात जाऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलण्यासारखे अनर्थ घडण्याची शक्यता आहे, तरी यामध्ये पोलीस यंत्रणेने लक्ष घालून फायनान्स कंपन्याचे गुंड व मॅनेजमेंटवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली असून व रिक्षाचालकांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.

निवेदन देतेवेळी लाल बावटा रिक्षा युनियन पिंपरी चिंचवडचे सचिव गणेश दराडे, सचिन देसाई, अमिन शेख, अपर्णा दराडे, गौस शेख, सिद्राम बोऱ्हाडे, स्वप्निल जेवळे, इम्रान तांबोळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय