Kolhapur (यश रुकडीकर) : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. (Kolhapur)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की मोतीनगर, कंजारभाट वसाहत, एसएससी बोर्डाच्या जवळ, कोल्हापूर येथे पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार केली जाते. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलिसांच्या पथकाने दि.२६ रोजी पहाटे छापेमारी करून ६ हातभट्ट्या नष्ट केल्या.
सदर ठिकाणी अशा प्रकारची दारू तयार करण्यासाठी लागणारे ९०० लिटर कच्चे रसायन,१८० लिटर पक्के रसायन,१२० लिटर तयार दारू व इतर साहित्य असा एकूण ५०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. सदर गुन्ह्याबद्दल १ इसम व ५ महिला सर्व राहणार मोतीनगर, कंजारभाट वसाहत यांच्याविरुध्द राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, खंडेराव कोळी, चंदू ननवरे, शहनाज कनवाडे, अमर आडुळकर, युवराज पाटील, अमित मर्दाने, अशोक पवार, वसंत पिंगळे, दिपक घोरपडे, ओंकार परब, सोमराज पाटील आदींनी केली.
हेही वाचा :
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे