Thursday, December 26, 2024
Homeआरोग्यकोल्हापूरात परजिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश बंद

कोल्हापूरात परजिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश बंद

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग तोडण्यासाठी (शनिवारी) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तीन शिफ्टमध्ये साडेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे. जिह्याच्या सीमांवर 19 ठिकाणी चेकनाके उभे करण्यात आले आहेत. तसेच, सतत गस्त सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना दिली.

कोल्हापूर जिह्यात व शहरात प्रवेश करणाऱया सर्व ठिकाणी आणि सर्व चौकांत तपासणीनाके उभे केले आहेत. परजिह्यांतून कोल्हापुरात येणाऱया पासधारकांनाच जिह्यात प्रवेश दिला जाणार आहे.

नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यापूर्वी जिह्यात 9 ठिकाणी तपासणीनाके उभारले होते. यात आता आणखी 10 नाके वाढविण्यात आले आहेत. कर्नाटक, गोव्यामधून महाराष्ट्रात येणाऱया प्रत्येक व्यक्तीला आरटीपीसीआर तपासणीचा रिपोर्ट असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी 4 एप्रिल ते 12 मे अखेर मास्क न घालणाऱया 16 हजार 341 जणांवर कारवाई केली. त्यातून 34 लाख 64 हजार 500 इतका दंड वसूल केला, तर 5 हजार 140 वाहने जप्त केली. 61 हजार 865 मोटार व्हेइकलच्या केसेस केल्या आहेत. एकूण 1 कोटी 3 लाख 44 हजार 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

असा असेल बंदोबस्त :

अपर पोलीस अधीक्षक – 2

पोलीस उपअधीक्षक – 6

पोलीस निरीक्षक – 25

एपीआय,पीएसआय – 85

पोलीस कर्मचारी – 2200

होमगार्डचे जवान – 1100

संबंधित लेख

लोकप्रिय