जुन्नर : जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसत नाही. तालुक्यातील सध्या एकूण ऍक्टिव रुग्ण संख्या १ हजार ३३२ झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा ४५८ असा झाला आहे. या पार्श्वभूमीवर (ता. १४ मे) रोजी नारायणगाव येथील श्री हॉस्पिटल यांच्या माध्यमातून DCHC कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते नारायणगाव याठिकाणी करण्यात आले.
यावेळी या कोविड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना माफक दरात चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळेल अशी अपेक्षा आमदार बेनके यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांच्या समवेत सुरज वाजगे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, शेखर शेटे, सुदीप कसाबे, सागर दरंदळे, डॉ.प्रकाश काचळे, डॉ.प्रविण शिंदे व या सेंटरचे इतर डॉक्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते.