Sunday, May 19, 2024
HomeNewsप्रलोभने आणि आश्वासनाने कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या नरेंद्र मोदी चा धोका ओळखा –...

प्रलोभने आणि आश्वासनाने कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या नरेंद्र मोदी चा धोका ओळखा – कॉ.के.आर.रघू

लाल झेंडा फडकवून वर्गीय चळवळीतील शहीद हुतात्म्यांना लाल सलामी !

सोलापूर
: वाढती महागाई आटोक्यात आणू,पेट्रोल डिझेल व घरगुती इंधन दर कमी करू,काळा पैसा आणू, बेरोजगार युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, देशाला आत्मनिर्भर करू अशी पोकळ घोषणा, खोटी आश्वासने आणि फसवी प्रलोभने देऊन देशवासियांचा घात मोदी सरकार ने केलेला आहे. त्यामुळे श्रमिक कामगार देशोधडीला लागले. अशी टीका करत हा नरेंद्र मोदींचा वाढता धोका ओळखा असा इशारा सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स चे राज्य कोषाध्यक्ष के.आर.रघू यांनी अधिवेशनच्या उद्घाटनपर भाषण करताना दिला.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स सोलापूर चे 16 वे राज्य अधिवेशन रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे पार पडले. या अधिवेशनाची सुरुवात प्रजा नाट्य मंडळ कलापथकांच्या क्रांतिकारी गीताने झाली. ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून वर्गीय चळवळीतील शहीद हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आले. स्वागत युसुफ शेख मेजर यांनी केले.

यानंतर मागच्या तीन वर्षात वर्गीय चळवळ, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, रंगभूमी, संशोधन, कला, क्रीडा, राजकीय, कामगार चळवळ, देशभक्त, सरंक्षण क्षेत्रात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण व अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली ठराव सिटू च्या नेत्या माजी नगरसेविका कॉ.नलिनीताई कलबुर्गी यांनी मांडले. तद्नंतर सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी व्यासपीठावर प्रा.अब्राहम कुमार, कुरमय्या म्हैत्रे, माजी नगरसेविका कामीनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, मुरलीधर सुंचू, दीपक निकंबे, डी.रमेश बाबू, विल्यम ससाणे, डी.वाय.एफ.आय.चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, अकील शेख, बापू साबळे, बजरंग गायकवाड, बाळकृष्ण मल्याळ, मोहन कोक्कुल, सनी शेट्टी, गीता वासम, सावित्री गुंडला, शरिफा शेख, शहनाज शेख, तौफिक शेख, आरिफ मणियार, शहाबुद्दीन शेख, इलियास सिद्दीकी, अँड.नसिर मशाळवले, बाबू कोकणे, नरेश दुगाने, अकिल शेख आदी पदाधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अँड.अनिल वासम यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय