Monday, May 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर रयत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर रयत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मभूषण खासदार शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीने शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी ‘कर्मवीर रयत मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे करण्यात आले होते. 

या स्पर्धेसाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजित पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख IAS (Rtd.), नोबल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.दिलीप माने, राष्ट्रीय विकास केंद्राचे सचिव निरंजन केळशीकर व भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे चेअरमन भगवानराव बेंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

कर्मवीर रयत मॅरेथॉन 2023 स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Rtd.), रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.राम कांडगे, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी आमदार चेतन तुपे-पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व आर्यनमन सायकलपटू दशरथ जाधव, सुवर्णपदक विजेती राष्ट्रीय खेळाडू (खो-खो) शीतल वाघ, आर्यनमन (कझाकिस्तान कॉम्रेड द.आफ्रिका) शंतनू जगदाळे, लेफ्टनंट कर्नल दारा सिंह चहल (उंचउडी गोल्ड मेडलिस्ट, ज्यु. नॅशनल गेम्स), नायब सुभेदार राहुल (20 km. चालणे स्पर्धा, टोकियो ऑलम्पिक 2021) उपस्थित होते. 

तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्यअरविंद तुपे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे, पश्चिम विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुदाम शिंदे व वडगाव मावळ स्कूल कमिटीचे सदस्य मनोज ढोरे हे उपस्थित होते. 

कर्मवीर रयत मॅरेथॉन 2023 स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम भागातील सर्व सिनिअर महाविद्यालये, ज्युनिअर महाविद्यालये, शाळा आणि  साधना शैक्षणिक संकुलातील सुमारे 17397 विद्यार्थ्यांनी ‘रन फॉर ग्रीन टुमारो’ ही थीम घेऊन स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. 

या स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आली होती.  स्पर्धेची सुरुवात एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणातून झाली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी झाले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एस. एम.जोशी महाविद्यालयातील इनडोअर हॉलमध्ये संपन्न झाला. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.राम कांडगे साहेब म्हणाले स्पर्धेतून क्रीडा क्षेत्रात वेगवेगळे गुणवान खेळाडू तयार व्हावेत असे मत व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Rtd.) म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत. असे मत व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी आमदार चेतन तुपे-पाटील म्हणाले जीवन हीच एक स्पर्धा आहे ती प्रत्येकाने यशस्वी पद्धतीने पार पाडायची असते, असे मत व्यक्त केले.

पाचवी ते सातवी या गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक साहिल टेंगळे (साधना विद्यालय मुले), द्वितीय क्रमांक गणेश म्हेत्रे (वडगाव धायरी), तृतीय क्रमांक विकास जाधव (साधना विद्यालय मुले) उत्तेजनार्थ अर्जुन मुडावत (वडगाव धायरी व मनीष मौर्य (के.के. घुले विद्यालय मांजरी बुद्रुक) पाचवी ते सातवी मुलींच्या गटातील क्रमांक प्रथम क्रमांक विधी कांबळे (साधना विद्यालय), द्वितीय क्रमांक धनश्री केसकर (साधना विद्यालय मुली), तृतीय क्रमांक निशा कुवर (धायरी) उत्तेजनार्थ ऋतुजा गाढवे (साधना मुली) व आर्या फरांदे (देहू मुली) आठवी ते दहावी मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक आर्यन मगर (वडगाव मावळ), द्वितीय क्रमांक सोहम सोळंके (केके घुले विद्यालय मांजरी), तृतीय क्रमांक आदित्य गायकवाड (साधना इंग्लिश मीडियम स्कूल) उत्तेजनार्थ प्रेमराज नलावडे (साधना विद्यालय) व साहिल लोकरे (वडगाव मावळ) आठवी ते दहावी मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक श्रावणी वाघमोडे (चंद्रभागाबाई तुपे साधना कन्या महाविद्यालय), द्वितीय क्रमांक जानवी शिंदे (चंद्रभागाबाई तुपे कन्या महाविद्यालय) तृतीय क्रमांक साक्षी  सूर्यवंशी (चंद्रभागाबाई तुपे कन्या महाविद्यालय) उत्तेजनार्थ क्रमांक सिद्धी सकट (चंद्रभागाबाई तुपे कन्या महाविद्यालय) रूपाली कुशवाह (न्यू.इंग्लिश स्कूल कोलवडी),

अकरावी आणि त्या पुढील गटात प्रथम क्रमांक जीवन शिंदे (एस. एम. जोशी महाविद्यालय) द्वितीय क्रमांक पावरा भोगला (एस. एम. जोशी महाविद्यालय) तृतीय क्रमांक अथर्व कागे (एस. एम. जोशी महाविद्यालय) उत्तेजनार्थ क्रमांक इगवे मनोज (एस. एम. जोशी महाविद्यालय) व यादव संकेत (एस. एम. जोशी महाविद्यालय) अकरावी व त्यापुढील मुली प्रथम क्रमांक आरती सकट (एस. एम. जोशी महाविद्यालय), द्वितीय क्रमांक मोहिनी लकडे (एस. एम. जोशी महाविद्यालय), तृतीय क्रमांक वैशाली गबाले (एस. एम. जोशी महाविद्यालय), उत्तेजनार्थ सानिया शेख (न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ) व पायल हरपळे (आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज) या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी केले. तर पाहुण्यांचा व खेळाडूंचा परिचय पश्चिम विभागीय सहाय्यक अधिकारी शंकर पवार यांनी करून दिला. याप्रसंगी डॉ.नम्रता कदम यांच्या ‘मराठी साहित्य प्रसार आणि आकाशवाणी’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सांघिक विजेतेपदाचा चषक एस. एम. जोशी कॉलेजने मिळविला.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. किशोर काकडे, क्रीडा विभागप्रमुख प्रा.दत्ता वसावे, उपप्राचार्य प्रा. संजय जड़े, उपप्राचार्य डॉ.संजय जड़े, डॉ.अतुल चौरे आणि शेखर परदेशी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ.धनंजय भिसे, प्रा. नयना शिंदे व प्रा.काजल गौडदाब यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील आणि साधना शैक्षणिक संकुलातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय