Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शाळा सुधारण्याची फक्त घोषणा, अंमलबजावणी कधी? – यशवंत कांबळे

दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर शाळा सुधारण्याची फक्त घोषणा, अंमलबजावणी कधी? – यशवंत कांबळे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये दिल्लीमधील सरकारी शाळांचे जे अप्रतिम मॉडेल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पुढाकाराने संपूर्ण जगामध्ये नावारूपाला आले आले, त्याची पाहणी करण्यासाठी महानगर पालिका शाळांचे शिक्षक व 35 अधिकारी यांचे शिष्टमंडळ नुकतेच दिल्लीला जाऊन आले होते. आम आदमी पार्टी या दौऱ्याचे मनापासून स्वागत करते, अशी भावना ‘आप’चे मीडिया प्रमुख यशवंत कांबळे ह्यांनी व्यक्त केली.

काही वर्षांपूर्वी सुद्धा पालिकेतील नगरसेवक व शिक्षण विभागाचे अधिकारी दिल्लीला जाऊन केजरीवाल सरकारच्या “दिल्ली मॉडेलची” पाहणी करून आले होते. त्यावेळेस सुद्धा खूप गाजावाजा होऊन मनपा शाळांमध्ये सुधारणा करू, असे प्रशासनाने जाहीर केले होते.

त्याचप्रमाणे दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’ प्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये जिजाऊ क्लिनिक सुरू करू असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षामध्ये ते आजपर्यंत पूर्णत्वास आले नाही, त्यामुळे यावेळेस तरी आयुक्तसाहेबांनी शाळांचा दवाखान्यांचा दर्जा उंचावून पिंपरी चिंचवडकरांना दिलासा द्यावा. ‘जिजाऊ क्लिनिक’ सुद्धा सर्वत्र सुरू करावे, अशी मागणी यशवंत कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय