Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्मदिवस अनोख्या पध्दतीने साजरा !

जुन्नर : अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्मदिवस अनोख्या पध्दतीने साजरा !

जुन्नर : विसाव्या शतकाचे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा १४ मार्च हा जन्मदिवस असतो. त्यांनी असे लिहून ठेवले आहे की, “पृथ्वीतलावरून मधमाशी नाहीशी झाली तर चारच वर्षात मानव जात नष्ट होईल.” त्यांचा जन्मदिवस शिरोली खुर्द ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे साजरा करण्यात आला.

 

केंद्रीय मधमाशी संशोधन आणि अनुसंधान परिषद , पुणे चे मास्टर ट्रेनर प्रा. हेमंतकुमार डुंबरे यांनी शाळेतील मुलांना व मुलींना मधमाशी आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या बद्दल माहिती दिली. 

पुणे : जुन्नरच्या ८ मुलींची ५० किलोमीटरची सायकलवारी !

मुंबई : जुन्नर च्या अंगणवाडी कर्मचारी धडकल्या आझाद मैदानावर !

मधमाशीचे मानवी जीवनातील व शेतीमधील स्थान, मधमाशी मध कसा तयार करते, मधमाशी पालनासाठी कोणत्या झाडांच्या फुलांची गरज असते, मधमाशीच्या पोळ्याची रचना, कामकरी माशी डंख मारते म्हणजे नेमकी काय करते, इ. बाबत माहिती दिली. मधमाशी बद्दलचे व्हिडिओ व गोष्टीरूप माहिती सांगितली‌ 

सर्व मुलांनी व मुलींनी सविस्तर माहिती मिळाली व जीवनात मधमाशीला त्रास देणार नाही व मधमाशी संवर्धन करू असे कार्यक्रमाच्या नंतर सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली डुंबरे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका विजया इंगळे यांनी केले.

माजी आमदार शरद सोनवणे यांचा आमरण उपोषणाचा इशारा!


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय