जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर शहरातील शंकरपुरा पेठ येथे संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये जुन्नर शहरातील आबाल-वृद्धासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर यंदा प्रथमच हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.
संस्कृती प्रतिष्ठान जुन्नर यांनी केलेल्या नियोजनातील छत्रपती संघर्ष ढोल-ताशा पथकाने विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या उत्सवास ओतुर, जुन्नर शहर व परिसरातील गोविंदा पथकांनी मानवी साखळी रचत दहीहंडीला सलामी दिली तर मयूर महाबरे यांच्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज नानावटी, उपाध्यक्ष सनी कर्पे, सेक्रेटरी सुरज खत्री, माजी अध्यक्ष सुमित लांडे, मार्गदर्शक अनिल रोकडे, सल्लागार राजेंद्र खत्री, सतिष कवडे, अरुण तांबे, रुपेश दुबे, दीपक वाळुंज, शरद भगत, गौतम सुरडकर आदी उपस्थित होते.