जुन्नर : आज पहाटेच्या सुमारास कल्याण अहमदनगर महामार्गावर असलेल्या खामुंडी गावच्या हिम्मत हवेली परिसरात बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. सुदैवाने या घटनेत कोणतेही जिवितहानी झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिंक नुकसान झाले आहे.
ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. पेट घेताच गाडीतील दोघांनी प्रसंगावधान राखत आपला जीव वाचला.
घटनेची माहिती समजताच ओतूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे, पोलिस शिपाई राजेंद्र बनकर, पोलिस पाटील तसेच डुंबरवाडी टोलनाक्यावरील कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण करत आग आटोक्यात आणली. या आगीत कार पुर्णतः जळून खाक झाली आहे.