Junnar / आनंद कांबळे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगावचे मुख्याध्यापक मोहन ज्ञानेश्वर नाडेकर यांनी मराठी विषयात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेजुरचे मुख्याध्यापक तुकाराम किसन वडेकर हे शिक्षणशास्त्र विषयात सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून पात्र ठरलेले आहेत.
सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. मोहन नाडेकर हे उच्चविद्या विभूषित असून त्यांनी मराठी व इतिहास या दोन विषयात पदवी प्राप्त केली असून ते एम .ए. डी. एड .बी .एड असून सध्या पुणे विद्यापीठात ‘ इ.स.2000 नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी: समाजशास्त्रीय अभ्यास ‘या विषयावर पी.एचडी करत आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबोली व उच्छील येथे तर माध्यमिक शिक्षण अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर व महाविद्यालयीन शिक्षण शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर (Junnar) येथे झालले आहे.
तुकाराम वडेकर यांचे शिक्षण शासकीय आश्रम शाळा सोनावळे व महाविद्यालयीन शिक्षण शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे झाले असून ते एम ए डी.एड बी एड पदवीधारक आहेत. SET परीक्षेत यश मिळवलेले हे दोन्ही प्राथमिक शिक्षक आंबोली गावचे सुपुत्र आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद